रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध

Admin

   

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात

        मार्केटयार्ड नजिकच्या  रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर दरोड्यातील संशयीतांचा शोध सुरुच आहे. दरम्यान पोलिसांनी आता मिळालेल्या प्राथमिक माहिती आधारे चार दरोडेखोरांची रेखाचित्र रेखाटली असून ती आता प्रसिद्ध केली आहेत. पाच जिल्ह्यातील पोलिस पथके तपासात कार्यरत असून अद्यापही कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही, असेहि पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

        दरोडा घालून तब्बल १४ कोटी रुपयांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने सापडली. परंतु दरोडेखोर मात्र अद्यापही हाती लागलेले नाहीत.परराज्यात गेलेल्या पोलिस पथकांनी काही संशयीतांची चौकशी करुन दरोडेखोरांचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. दरोड्याच्या तपास कामात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बाराहून अधिक तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या यंत्रणांचा देखील तपास कामात सहभाग आहे. यापूर्वी सांगली पोलिसांची स्वतंत्र आठ पथके स्थापन केली असून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यात पथकांना रवाना केली आहेत. तेथे गेलेल्या पथकांनी त्यांना संशय आलेल्या काहीजणांची चौकशी केली असली तरी त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.

        पोलिसांनी गुरुवारी सीसीटिव्हीत कैद झालेल्या आणि ज्वेलर्समधील कर्मचार्‍यांशी संवाद साधून चौघा संशयितांची रेखाचित्रे रेखाटली आहेत. रेखाचित्रातील संशयीतांसदर्भात काही माहिती असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. माहिती देणार्‍यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आली.
दरोडेखोरांनी वापरलेल्या चारचाकीची आज न्यायवैद्यक तापसण्या (फॉरेन्सिक) करण्यात आले. याचे पथक दिवसभर विश्रामबाग पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. अगदी बारकावेही टिपले जात होते. पुरूषांच्या केसाला लावायचा झिकझॉक बेल्ट सापडला आहे. यातील संशयितांचे मोठे केस असण्याची शक्यता आहे.


To Top