राष्ट्रवादीचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : पवारांना धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी

Admin


 

शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी

कवठेमहांकाळ : डिजिटल हॅलो प्रभात 
                        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन कवठे महांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते,पदाधिकारी,महिला पदाधिकारी, युवक,युवती तसेच कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जत रोड येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालया समोर प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला.
            देशाचे नेते शरद पवार यांच्या सक्षम नेतृत्वात आपल्याला काम करायला मिळत आहे हे आपल्या सर्वांचे भाग्य असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व पवार साहेबांची विचारधारा,कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जास्तीत जास्त जनहिताचे कार्य येणाऱ्या काळात करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे मत पक्षाचे तालुक्यातील ज्येष्ठ आणि प्रमुख नेते यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना यावेळी व्यक्त केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या नराधमाचा कवठे महांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच भविष्यात असे प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या नराधमावर कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन कवठे महांकाळ पोलिसांना देण्यात आले.
            यावेळी तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष हणमंत देसाई,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक चंद्रकांत हाक्के,तालुका कार्याध्यक्ष महेश पवार,प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी,युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष अजित लाटवडे,कार्याध्यक्ष शहाजी दोडमिसे,नगरसेवक ईश्वर वनखडे,राहूल जगताप,संजय माने,महेश तेली,संजय माळी,आबा कुनुरे,विशाल रसाळ,कुमार पाटील,रवी माने,प्रशांत खाडे,महादेव माळी,संजय कोठावळे,नितीन पाटील,विजय पाटील,सुरेखाताई कोळेकर,साईश्वरी जाधव,मीनाक्षी माने,पवित्राताई खोत,दिपा जाधव, सुवर्णाताई कवठेकर,अस्मिता सगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


To Top