श्री स्वामी समर्थ अन्नछत्र व भक्तनिवास वास्तुशांत सोहळा

Admin

 

जयसिंगपूर : डिजिटल हॅलो प्रभात
            येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र व भक्तनिवास या वास्तूचा वास्तुशांती सोहळा बुधवार दि.१४ व १५ जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. तरी या वाक शांत सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जयसिंगपूर शहर आणि परिसरातील सेवेकरांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
            लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल शेजारी ठाणेकर मळ्यामध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा विकास केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र व भक्त निवास या भव्य वास्तु साकारण्यात आली आहे. या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या वास्तुशांती सोहळ्यानिमित्त गुरुवार दि. ८ ते  १५ जून पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यादरम्यान सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठ वाचन, मंगळवार दि. १३ रोजी ग्रामदेवता आवाहन, बुधवार दि. १४ रोजी सकाळी सात वाजता वास्तू प्रवेश चंडीयाग आणि सकाळी नऊ वाजता वास्तुशांत, तर गुरुवार दि.१५ रोजी सकाळी सात वाजता सिद्धमंगल पूजा दुपारी बारा वाजता महाप्रसाद विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.


To Top