शिराळा वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्याला संधी द्या : शिवाजीराव नाईक

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात 
पूर्वी कराड आणि आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आहे. दोन्ही मतदार संघातून वाळवा शिराळाची घुसमट होत आली आहे.  यावेळी लोकसभेला या मतदारसंघाला संधी द्यावी अशी मागणी शिवाजीराव नाईक यांनी पक्ष निरीक्षक यांच्याकडे करत तरीही  पक्षाचा असणारा निर्णय आम्हाला मान्य असेल असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री व पक्ष निरीक्षक शशिकांत शिंदे म्हणाले की, आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्याचा असला तरी तो महाराष्ट्र आणि देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरू शकतो.  आपणाला निवडणुकीत मोठे  यश मिळावयाचे असेल तर  बुथ कमिट्या  सक्षम करा. भाजपवाले हुकूमशाहीने वागत असल्याने निवडणुकीत ते  यशस्वी झाले तर लोकशाहीतुन न्याय मागणे अवघड होईल.   चिखली (ता.शिराळा) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिटी आढावा बैठकीत  ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक , आमदार अरुण लाड  , जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील , राज्याचे माहिती व तंत्रज्ञ सेल अध्यक्ष सारंग पाटील , सरचिटणीस बाळासाहेब पाटील , भूषण नाईक, प्रमोद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिंदे पुढे म्हणाले की,  देशातील विरोधकांची मोट बांधण्याचे काम फक्त शरद पवार हे करू शकतात. प्रचारात इव्हेंट मॅनेजमेंट प्रथा आली आहे. त्यामुळे बूथ  कमिटी अद्यावत करणे आवश्यक आहे.भाजप  हुकूमशाही , दबाव यंत्रणा आणि  शासकीय यंत्रणेचा वापर करून सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
राजकीय चावी पवारांच्या हाती

        जो पर्यंत शरद पवारांच्या सारखे नेतुत्व आहे तो पर्यंत या देशातील आणि राज्यातील राजकारणाची चावी त्यांच्या हाती असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे याबाबत कोणी काहीही म्हणू दे. असे सांगून शिंदे यांनी राजकीय किंग शरद पवार साहेबच असल्याचे सांगितले.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की,  जिल्हा परिषद ,पंचायत समिती,नगरपंचायत व पालिकांच्या निवडणुकीतील  जनमत चाचणी काय असे हे  सर्वाना माहित आहे. हेच  समजू नये म्हणून भाजप या निवडणुका पुढे ढकलून  लोकसभा निवडणूक घेण्याच्या प्रयत्नात आहे.  मात्र आम्ही शिराळ्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीत  एक ही जागा न देता  तालुक्यातून भाजपला हद्दपार करू..आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले ,शिराळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या बूथ कमिट्या सक्षम असल्याने कधी ही निवडणुका लागल्या तरी आम्ही सहज जिंकू. आम्हाला या मतदार संघात पोषक वातावरण आहे. यावेळी सारंग पाटील ,आमदार अरुण लाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  स्वागत व प्रास्ताविक विजयराव नलवडे यांनी केले. यावेळी ,साधना पाटील, सुस्मिता जाधव, वैशाली कदम , बसवेश्वर शेटे , सुनील कवठेकर , पोपट चरापले , विजय  महाडिक,शिवाजी पाटील ,कोंडीबा चौगुले, संदीप तडाखे  उपस्थित होते. हर्षद माने यांनी आभार मानले.


To Top