केशवप्रसाद मौर्य महाजनसंपर्क अभियानकरीता सांगलीत

Admin

 

सांगली :डिजिटल हॅलो प्रभात
        भारतीय जनता पक्ष सांगली लोकसभा मतदारसंघ यांच्या वतीने मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस, तासगांव कवठेमहांकाळ. सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये  रविवार ११ जून व सोमवार दि.१२ जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सांगली लोकसभा जनसंपर्क अभियानाचे संयोजक खासदार संजयकाका पाटील यांनी दिली .
याबाबत खासदार पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली त्याअंतर्गत मोदी @९ महाजनसंपर्क अभियान सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात उत्साहात राबविण्यात येत आहे. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील दौ-यामुळे जिल्हयातील जनतेत उत्साह असून सर्वसामान्य जनता त्यांचे जोरदारपणे स्वागत करणार असल्याची माहिती शेवटी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.  
To Top