कुंभोज : डिजिटल हॅलो प्रभात (विनोद शिंगे)
श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबली मध्ये नियोजित अहिंसा उद्यान व भक्तनिवास भूमिपूजन समारंभ संपन्न झाले. भक्तनिवास व अहिंसा उद्यान भूमिपूजन शुभारंभ कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या हस्ते झाले.
यावेळी बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, डॉ.राहुल आवाडे हे उपस्थित होते.
शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंदजी दोशी हे होते.स्वागत व प्रास्ताविक बाहुबली ब्रह्मचर्याश्रमचे अध्यक्ष सनत्कुमारजी आरवाडे यांनी केले. मान्यवर मनोगतामध्ये आमदार प्रकाश आवाडे म्हणाले की,"गुरूदेव समंतभद्र महाराजांच्या आशीर्वादाने बाहुबली बृहन्मुर्ती समोर भव्य असे अहिंसा उद्यान साकारत आहे यासाठी शासनाने दोन कोटींचे अनुदान दिले आहे तसेच भक्तनिवासाच्या बांधकामासाठी तीन कोटींचे अनुदान दिले आहे.
त्याच्याशिवाय होणारा जादा खर्च संस्था स्वता करणार आहे. बाहुबलीच्या विकासासाठी यापुढे देखील असेच प्रयत्न करणार आहोत. अध्यक्ष अरविंदजी दोशी म्हणाले की,"आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून यासाठी मी संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो व असेच कार्य त्यांच्या प्रयत्नातून व्हावे अश्या शुभेच्छा देतो.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये महामंत्री डी सी पाटील, धनराज बाकलीवाल, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, डॉ.बाळासाहेब चोपडे,सुधाकर मणेरे, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले,बलराम महाजन, तात्यासाहेब अथणे, जिल्हा परिषद चे अधिकारी मिसाळ साहेब, महावीर पाटील, आप्पासाहेब चौगुले, डॉ.शिखरे,कुंभोजचे उपसरपंच अनिकेत चौगुले, राजू नांद्रेकर, रवींद्र खोत, सहसचिव सुरेश चौगुले, ग्रामपंचायत सदस्य भरत भोकरे, मिसाळ, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, अध्यापक, अध्यापिका व श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार संचालक गोमटेश बेडगे यांनी मानले तर सूत्रसंचालन वैशाली पाटील व स्मिता निटवे यांनी केले.