ग्रोइंग चाइल्ड प्ले स्कूल मध्ये बालदिंडी उत्साहात

Admin


सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
            येथील येथील ग्रोइंग चाइल्ड प्ले स्कूलमधे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि पावलीसह टाळांच्या गजरात विदयार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.विठ्ठल नामाच्या गजराने वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. स्कूलच्या वतीने संचालक आजित वडर यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. 
            प्रथम पालखीची पूजा करण्यात आली. यानंतर टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठल नामाचा जयघोष करत फुलांनी सजवलेली पालखी घेवून वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. अग्रभागी भगवे ध्वज, पालखी आणि त्यानंतर विठ्ठल रुख्मणीच्या वेशभूषेतील चिमुकले बाळगोपाळ आणि उर्वरीत विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत दंग झाले होते. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खूप छान अशी पावली, रिंगण सोहळा सादर केला हे सर्व वातावरण अगदी मन भारावून टाकणारे होते. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. यावेळी शिक्षक आणि पालकांनी फुगडी धरून बालदिंडींचा आनंद द्विगुणित केला. यावेळी संचालिका अनघा कुलकर्णी यांच्यासह सोनाली घोरपडे,सुषमा कोलप, रजनी माळी,पूजा गोरनाळ,पूनम उपाध्ये, अमृता पाटील, चैताली खाडिलकर, पूजा लोंढे आदी उपस्थित होते.
To Top