आंतरराष्ट्रीय निवड चाचणीत अभिज्ञा पाटीलला रौप्य व कास्य पदक

Admin

पेठवडगाव : डिजिटल हॅलो प्रभात
                  येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज पटू सुवर्णकन्या,श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती अभिज्ञा अशोक पाटील( मूळ गाव तळसंदे, ता.हातकणंगले) हिने नवी दिल्ली याठिकाणी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी पाच व सहा मध्ये एक रौप्यपदक व कास्य पदक पटकाविले आहे.
                  अभिज्ञा ही भारती विद्यापीठ पुणे च्या मॅनेजमेंट कॉलेज कोल्हापूर येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे . महिलांच्या वरिष्ठ गटात अभिज्ञा १० मीटर एअर पिस्टल,२५ मीटर रॅपिड फायर पिस्टल आणि २५ मी. स्पोर्ट पिस्टल या खेळ प्रकारात खेळते. ही निवड चाचणी २४ ते ३० जून पर्यंत डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज , नवी दिल्ली या ठिकाणी सुरू आहेत. महिलांच्या वरिष्ठ गटात ०.२२ स्पोर्ट पिस्टल,२५ मीटर या खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय निवड चाचणी क्रमांक पाच व सहा मध्ये ६००पैकी ५८३ व५७६ गुणांची कमाई करत अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत एक रौप्य व एक कास्य पदकाची कमाई केली.
            या यशस्वी कामगिरीमुळे अभिज्ञाला भारतीय नेमबाजी संघटनेच्या अव्वल खेळाडूमध्ये समावेश झाला आहे. या निवड चाचणीमुळे इथून पुढे होणाऱ्या १९ वी आशियाई नेमबाजी स्पर्धा (हांगझहो- चीन ), वर्ल्ड चॅम्पियनशिप (बाकू-अझर बायजन) स्पर्धेसाठी यातील खेळाडूंची निवड होणार आहे, या दृष्टीने या निवड चाचणी फार महत्त्व आहे.
To Top