गवा रेड्याने मारल्याने एक जण गंभीर जखमी : सीपीआर येथे उपचारासाठी दाखल

Adminराधानगरी : डिजिटल हॅलो प्रभात (अनिता चौगले)
            तालुक्यातील दाजीपूर मध्ये असणाऱ्या वलवन येथे विजय अर्जुन पाटील यांना गवा रेड्याने मारल्याने गंभीर दुखापत झाली आहे.सध्या त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.विजय पाटील हे आपल्या शेळ्या घेऊन, शेतामध्ये गेले असता अचानक आलेल्या गवा रेड्यांनी विजय पाटील या शेतकऱ्यास धडक दिल्याने तो गंभीर जखम झाली आहे.वलवन येथे आजूबाजूच्या परिसरात गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. यामुळं गावात अशा घटना नेहमीच घडत असतात. यासाठी वन खात्याने दखल घेऊन यावर तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वलवन येथे राहणारे विजय पाटील हे गरीब होतकरू वर्गातील आहेत. शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह चालतो. यामुळं वन खात्याने याबाबत तातडीने मदत देऊन उपचार करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील,संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
To Top