राजे रामराव महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Admin

 

जत : डिजिटल हॅलो प्रभात
            येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक (शिवस्वराज्य) वर्षानिमित्त दि. ६ जून रोजी भारतातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 
            या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले. यावेळी परिसंवादासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा. सरदार रोहिले व इतिहास विभागप्रमुख प्रा.पुंडलिक चौधरी उपस्थित होते.
ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनात दुर्मिळ वस्तू, नाणी, शस्त्रे व हत्यारे यांचा समावेश होता. भारतातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन व संवर्धन या विषयावरील परिसंवादामध्ये प्रा. सरदार रोहिले यांनी ऐतिहासिक स्मारके, किल्ले, नाणी, कागदपत्रे इत्यादींची माहिती दिली. ऐतिहासिक वस्तूंवर मानवाच्या होणाऱ्या दुर्लक्ष व दुर्व्यवहारामुळे इतिहासाची हानी होत आहे. यासाठी लोकांमध्ये ऐतिहासिक वस्तू व स्मारकांविषयी जतन व संवर्धन करण्याची जनजागृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, ऐतिहासिक वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ऐतिहासिक वस्तूंना वस्तुसंग्रहालयात संग्रहित करण्याची गरज आहे. ऐतिहासिक वस्तू आपल्या पूर्वजांचा वारसा आहेत. यावरून आपल्याला भूतकाळातील मानवाचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. 
            या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा. पुंडलिक चौधरी, सूत्रसंचालन प्रा. अनिल लोखंडे तर आभार प्रा. राहुल कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व इतिहासप्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top