राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न : शरद लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण

Admin

 

देवराष्ट्रे : डिजिटल हॅलो प्रभात (संदेश जाधव)
                कडेगाव येथे दि.१० जून रोजी पलूस-कडेगाव तालुक्याचे नेते शरदभाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेने झाली. तद्नंतर जनसंपर्क कार्यालयासमोर मान्यवरांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाला मानवंदना दिली.
                  यावेळी मा. शरद लाड यांनी पक्षाच्याा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमास डी. एस. देशमुख, जयदीप यादव, सुरेशराव शिंगटे, रमेश एडके, वैशालीताई मोहिते, वैभव पवार, रामचंद्र देशमुख, सुरेश पाटील, विराज पवार,सोमनाथ पवार, संदीप काटकर, वैभव देसाई, सिकंदर मुल्ला, संभाजी पाटील, टी. एम. जाधव, सुशांत पाटील, संभाजी बाबर, रवींद्र मोहिते-पाटील, , अतुल नांगरे नवनाथ काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top