महिला मोफत बस प्रवास योजनेचा शुभारंभ

Admin

 

बोरगाव  : डिजिटल हॅलो प्रभात

                    बोरगाव येथील बसस्थानकावर काँग्रेस सरकारने राबवलेल्या महिला मोफत बस प्रवास योजनेचा शुभारंभ शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थित जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.कर्नाटक काँग्रेस सरकारने राज्यात सहा वर्षांवरील मुलीपासून ते बुजुर्ग महिला पर्यंत सर्वात राज्यात सर्वत्र ठिकाणी प्रवास करण्यात राबवली घोषणा करण्यात आली होती या घोषणेच्या अनुषंगाने रविवार ११ जून पासून दुपारी एक वाजल्या पासून या योजनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारने केला असल्याने बोरगावात माजी जिल्हा पंचायत सदस्य व काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने या योजनेचा शुभारंभ बहुसंख्य कार्यकर्त्यांचे उपस्थित करण्यात आला.
                    प्रारंभी उपस्थित महिलां व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हस्ते बस गाडी पूजन करून श्रीफळ वाढवत या योजनेचा बोरगाव स्थानकात शुभारंभ केला.दरम्यान निपाणी-चिक्कोडी कडे प्रवास करणाऱ्या महिलांना आधार कार्ड दाखवून या बस मधून पाठवण्यात आले.आणि इथूनच खऱ्या अर्थाने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यात महिलांनी येत्या तीन महिन्यासाठी आधार कार्ड दाखवूनच सर्वत्र प्रवास करायचा आहे.शिवाय पुढे सेवासिंधू कार्यालयातून स्मार्ट कार्ड देऊन संपूर्ण राज्यात पुढे मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात काँग्रेस सरकार कटिबद्ध असल्याचे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी सांगितले.त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी राबवलेल्या या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घेण्याचे ही आव्हान अण्णासाहेब हवले यांनी केले आहे.
            यावेळी युवा उद्योजक अनुज हवले,बाळासाहेब बस्सनवर,प्रधान व्यवस्थापक संजय हवले,अण्णासाहेब बारवाडे,नरसू बंकापुरे,विद्याधर अम्मनवर,शिवाप्पा माळगे,रावसाहेब तेरदाळे,बबन मुजावर,बाबासाहेब पाटील,अजित रोड्ड,अस्पाक मुजावर,भाऊसाहेब बंकापुरे,भरत हवले, सिद्धार्थ हवले,यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top