नीट मध्ये निहाल भालदार जिल्ह्यात पहिला

Admin


सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
        नुकत्याच लागलेल्या निट निकालामध्ये निहाल भालदार ने ७२० पैकी ६६६ गुण संपादन करून सांगली जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळवला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड सांगली मिरज कुपवाड महानगरिका क्षेत्राची महानगराध्यक्ष युवराज शिंदे, श्रीकांत पाटील, नितीन पवार, जयंत निरगुडे, रेखा पाटील, भारती पाटील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सातत्याने जिद्दीने निहालने अभ्यास केला. आई शमा भालदार व वडील फकृदिन भालदार, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
To Top