आर्या गारमेंटचे उद्घाटन संपन्न ; आ.विनय कोरे उपस्थित

Admin

कुंभोज :  डिजिटल हॅलो प्रभात 
             खोची तालुका हातकणंगले येथे आर्या गारमेंट व वसंत मंगलम कार्यालय उद्घाटन त्याच पद्धतीने महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव व गुरव शिंगे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीआमदार डॉक्टर विनय कोरे व शुभलक्ष्मी कोरे ह्या होत्या, यावेळी उद्योग व्यवसायात यशस्वी काम करणाऱ्या महिला व पुरुषांचा सत्कार करण्यात आला, तसेच गुणवंत विद्यार्थी आर्या गुरव,
आंतरराष्ट्रीय बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे,महिला गुरव पदाधिकारी शुभांगी गुरव, निवड पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आर्या गारमेंट चे उद्घाटन वारणा महिला उद्योग समूहाच्या प्रमुख शुभलक्ष्मी कोरे, वंसत
मंगलम मंगल कार्यालयाचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख पस्थितीत करण्यात आले. 
             यावेळी दलित मित्र अशोकराव माने हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी तसेच वारणा साखर कारखाना वारणा दूध संघ वारणा उद्योग समूहातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुहास गुरव, सचिन गुरव, सुरेश गुरव,सोमेश्वर शिंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सुहास गुरव प्रास्ताविक वसंतराव गुरव व सूत्रसंचालन पत्रकार विनोद शिंगे यांनी केले.

To Top