भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरावी : सागर शिनगारे

Admin

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निवेदन सादर

जत : डिजिटल हॅलो प्रभात
           जत तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील नागरिकांसह शेतकरी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे युवक नेते सागर शिनगारे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

जत कार्यालयाकडील रिक्त पदे
उप अधिक्षक -1
मुख्यालय सहाय्यक - 1
निमतानदार -1
दुरुस्ती लिपीक -1, अभिलेखपाल- 1
प्रतिलिपी लिपीक- 1, न.भु. लिपीक -1
दप्तरबंद – 1, आ.जा.लिपीक -1
भुकरमापक -3, शिपाई -3

        निवेदनात म्हटले आहे की, उप अधिक्षक भूमि अभिलेख जत या कार्यालयाचे आस्थापनेवर गट ब वर्ग 2 संवर्गासह एकुण 23 कर्मचारी यांची आस्थापना मंजुर आहे. जत तालुक्याचे क्षेत्राचा विस्तार खुप मोठा आहे. याच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील पलुस तालुका 35 गावांचा असुन या तालुक्यासाठी 23 पदे मंजुर असुन सर्व पदे कार्यरत आहेत. जत तालुक्याच्या कार्य कक्षेत एकुण 124 गांवे येत आहेत. त्यानुसार दरमहा शेतकऱ्यांचे जमीन मोजणी अर्जाची संख्या 50 ते 60 पर्यंत आहे. कार्यालयामध्ये सद्यस्थितीत सुमारे 1300 जमीन मोजणी प्रकरणे मोजणीच्या प्रतिक्षेत आहेत. तथापि एकुण 15 पदे रिक्त असलेने मोजणीच्या सेवा शेतकऱ्यांना वेळेत पुरविणे अश्यक्य आहे. त्यामुळे सदरची पदे तात्काळ भरणे अत्यंत गरजेचे आहे. सदरची पदे तात्काळ भरल्यास प्रलंबीत मोजणी प्रकरणे मार्गी लागणार आहेत. जत तालुक्यातील मोजण्यांची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी रोवर 4, ईटीएस 2, प्लॉटर-2, कॉम्प्युटर-3 व प्रिंटर -3 इतकी साधन सामुग्रीची आवश्यकता आहे. तरी सदर साधनसामुग्री मिळणे आवश्यक आहे.

To Top