मनसे चा पोलिस ठाण्यावरील मोर्चा स्थगित!

Admin

 

अवैध धंद्यावर कारवाई करणार ;
उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली ग्वाही

सांगली :डिजिटल हॅलो प्रभात
            सांगली शहरासह परिसरातील अवैध धंदे मोडित काढू डिस्को बारना नोटिसा बजावल्या आहेत लवकरच कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करणार असल्याची ग्वाही सांगली शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली. यामुळे येत्या १२ रोजीचा शहर पोलिस ठाण्यावरील मोर्चाही स्थगित करण्यात आला असल्याचे सांवत यांनी सांगितले.
            ते म्हणाले, सांगली शहरासह परिसरामध्ये क्राईम रेट वाढला होता. खून, खूनी हल्ले, चौऱ्या दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डिस्को बारची संस्कृती फोफावली आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी बदली करावी. अवैध पंदे बंद करावेत या मागणीसाठी १२ रोजी शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या दालनामध्ये बैठक झाली. शहरातील कायदा व सुव्यवस्था, अवैध धंदे याबाबत सविस्तर चर्चा झाली. डिस्को संस्कृती, बारबाबतही तक्रार करण्यात आली.
            जाधव यांनी यापुढे शहरातील सर्वन अवैध धंद्यावर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही याशिवाय डिस्को वारना नोटिसा बजावल्या आहेत लवकरच कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करु अशी ग्वाही दिली. त्यामुळे १२ रोजीचा मोर्चा स्थगित केला आहे असेही सावंत यांनी सांगितले. जिलाउपाध्यक्ष संदीप टेंगले दयानंद मलपे विठ्ठल शिंगाडे, संग्राम पाटणकर अमित पाटील, स्वप्नील शिंदे, सागर कोळेकर अमर ओलेकर आदी उपस्थित होते.


To Top