शाळा विकासाच्या दृष्टीने लागेल ते सहकार्य करू : अजित सावंत

Admin

 

सुभेदार दशरथ आवळे यांच्या हस्ते वह्या वाटप

विटा : डिजिटल हॅलो प्रभात
            शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच शाळेच्या भौतिक सुविधाच्या दृष्टीने लागेल ते सहकार्य करू असे जाधववाडी ग्रामपंचायतचे ढोराळवाडी येथील सदस्य अजित सावंत यांनी सांगितले.जिल्हा परिषद शाळा ढोराळवाडी तालुका खानापूर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा यांचीही भविष्यात पूर्तता केली जाईल असे त्यांनी सांगितले. ढोराळवाडी येथील देश सेवेमध्ये असलेले सुभेदार दशरथ आवळे यांनी आज शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपचे वितरण केले.
            सुभेदार आवळे म्हणाले, मुलांना स्पर्धा परीक्षांची जाणीव आतापासूनच होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना चांगली सवय आणि शिस्त ही शालेय जीवनातच लागते. त्यासाठी पालक आणि शिक्षक यांचा योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. पुढील काळातही लागेल ती मदत करण्याची ग्वाही आवळे यांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्या सुजाता सावंत, बाळासो जाधव, अण्णासो सावंत, सुभद्रा आवळे, अर्चना सावंत, दिपाली आवळे, कविता सावंत यांच्यासह पालक उपस्थित होते. स्वागत व आभार शाळेचे मुख्याध्यापक महादेव कांबळे यांनी मानले.
To Top