नेहरूनगर येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin

 

येळावी : डिजिटल हॅलो प्रभात
                नेहरूनगर (ता.तासगांव) येथे तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रोहीत आर्.आर्.आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.नेहरूनगर ग्रामपंचायत व महालक्ष्मी ब्लड बॅक, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सुमारे ७० बाॅटल रक्त संकलित करण्यात आले.यांवेळी रक्तदात्यांना स्पोर्ट् शुज व टिफिन भेट म्हणुन देण्यात आले,शिबिरास स्वत: रोहीत पाटील यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. शिबिराचे आयोजन नवनाथ मस्के, सरपंच ऋतुजा जाधव,उपसरपंच अविनाश पाटील, रामदास जाधव जालिंदर मस्के, विजय कोळी, अतुल पाटील, डाॅ.दिपक पाटील यांनी केले.
To Top