नांगोळे गावची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पर्धा, विभाग स्तरीय पाहाणी

Admin

घाटनांद्रे : डिजिटल हॅलो प्रभात
                नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास व स्वच्छता कामाची पाहणी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा विभागस्तरीय तपासणी समितीने केली.यावेळी ग्रामपंचायतीने केलेल्या सांडपाणी,घनकचरा व्यवस्थापन, लोकसहभागातून केलेली कामे,घर व गाव स्वच्छता,शौचालय व्यवस्थापन,बायोगॅस प्रकल्प, पशुसंवर्धन व्यवस्था,महिलांचे आरोग्य याविषयी पाहाणी केली.
त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम स्व आर आर (आबा) उद्यान,आयुर्वेदिक गार्डन,ओपन जीम,जलसंधारण कामे,स्पर्धा परीक्षा अभ्यासिका,अंगणवाडी,जिप शाळा,आरोग्य उपकेंद्र,गप्पी मासे पैदास इत्यादी कामाची पाहणी केली.
            सदर समितीचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत केले.समिती मध्ये पुणे विभागाचे उपआयुक्त विजय मुळीक,डॉ सिमा जगताप, सहायक आयुक्त पुरुषोत्तम पाटोदकर,उपसंचालक देशमुख साहेब,कार्यकारी अभियंता शैलेश सराफ,सहायक प्रशासन अधिकारी अविनाश लोखंडे,कनिष्ठ सहायक छाया चपटे,कनिष्ठ सहायक विलास कसबे हे होते.
तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव,गटविकास आधिकार उदयकुमार कुसुरकर,तालुका आरोग्य अधिकारी रुपनर मॅडम,विस्तार अधिकारी डी आर गुरवसह कवठेमहांकाळ बाजार समितीचे माजी चेअरमन दादासाहेब कोळेकर सरपंच छायाताई कोळेकर,उपसरपंच दादासो हुबाले,सोसायटीचे चेअरमन विलास हाक्के,ग्रामसेविका धनश्री पाटील-पोळसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने चाललेल्या विकास कामांची व विविध योजनांची सरपंच सौ छायाताई कोळेकर यांनी समितीला माहिती दिली.तर ग्रामसेविका धनश्री पाटील-पोळ यांनी गावात केलेल्या विविध विकास कामाचे पी पी टी द्वारे सादरीकरण केले.
To Top