नरेश गजभिये यांचा बहुजन जनता दलात प्रवेश

Admin

 

भंडारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

भंडारा : डिजिटल हॅलो प्रभात
            गोंदिया पब्लिक स्कूल लाखांदूर जिल्हा भंडारा व स्व. आर पी पुंगलिया नवगाव यांचे मॅनेजर डायरेक्टर .दैनिक लोकजनचे लाखांदुर प्रतिनिधी आणि भंडारा जिल्ह्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते नरेश बाळकृष्ण गजभिये यांनी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आधारित कार्य करणाऱ्या बहुजन जनता दल आणि बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या समर्थकासह बहुजन जनता दलामध्ये प्रवेश केला असून नरेश गजभिये यांचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी स्वागत करून नरेश गजभिये यांची भंडारा जिल्हा बहुजन जनता दलाच्या अध्यक्षपदी लेखी पत्र देऊन नियुक्ती केली आहे. बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी माझी नियुक्ती करून माझ्यावर दाखविलेल्या विश्वास या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता भंडारा जिल्ह्यामध्ये बहुजन जनता दलाला आणि दलित वंचित बहुजन अल्पसंख्यांक व अनेक घटकांना सोबत घेऊन वैभव प्राप्त करण्याचा मी प्रमाणिकपणे प्रयत्न करणार असा विश्वास नरेश गजबे यांनी व्यक्त केला. बहुजन जनता दल भंडारा जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर करून भंडारा जिल्ह्याचा दौरा करून करणार व जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्याही नियुक्ती करणार असल्याची माहिती नरेंद्र गजभिये यांनी दिली.

To Top