लोअर परळ वरळी सामाजिक विकास संस्थेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Admin

 

भिवाळी : डिजिटल हॅलो प्रभात (गुरुनाथ तिरपणकर)
            ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील संत गाडगे महाराज आदिवासी आश्रम शाळा भिवाळी या ठिकाणी नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शाळेतील साडेपाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी लोअर परळ वरळी सामाजिक विकास संस्थेने सत्कर्मी कार्य केले. कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे शाळेतील मुलींनी लेझीमनृत्य मध्ये स्वागत करत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण केले, गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान देऊन, साडेपाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून, शाळेतील मुलींच्या सुंदर गायनातून व सुंदर लेझीम नृत्यामुळे उपस्थित पाहुणे भारावून गेले. शाळेचे संचालक अनिल आवटे सर यांनी आपल्या मनोगतात पावसाळा येतो तसा प्रत्येक वर्षी पावसाळ्या प्रमाणे पाटकर साहेब या शाळेत येतात मुलांना जे हवे त्या गोष्टी या शाळेला ते देतात त्यांचे हे कार्य अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सामाजिक कार्यात ते सदैव तत्पर असतात. 
            महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. श्री प्रकाश वसंत पाटकर यांनी अनिल आवटे सरांचे काम चांगले असल्यामुळे शाळेची चांगल्या प्रकारे प्रगती असून त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी गाडगेबाबांच्या चरणी प्रार्थना केली तसेच शाळेची शिस्त व मुलांचे पालन पोषण खूप छान प्रकारे या ठिकाणी दिसून आल्याचे आण्णासाहेब आहेर (पत्रकार) यांनी सांगत शिक्षक व इतर सहकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व गाडगेबाबा मुळे अनेक मुलांचे आयुष्य प्रकाशमय झाले असून त्यांचे स्मारक सदैव प्रकाशमय ठेवण्याचा आग्रह रुपी सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विजयानंद राजे साहेब (आर्किटेक) यांनी स्वीकारले सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीमती सुंदराबाई वसंत पाटकर, यशवंत सुर्वे साहेब, कमलेश अंबेलकर, गणेश परब सर, राजेश भाई शाहा (C.A), विलास खानोलकर साहेब (पत्रकार), विलास गवस साहेब, विजय पवार साहेब (समाजसेवक), कवी व पत्रकार श्री देवळेकर साहेब, उदय वाडकर साहेब, पाटील साहेब, हरीश पगारे साहेब, मुर्वस्कर साहेब, छायाताई गचके मॅडम, मायाताई बर्वे मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर, शशिकांत सावंत, (पत्रकार) आण्णासाहेब आहेर (पत्रकार), राजश्री काळे (चित्रपट अभिनेत्री), डॉ. सूर्यभान डोंगरे, सौ. मीनाक्षी डोंगरे, सागर नारायण सातवसे (संस्थेचे सचिव)संस्थेचे सल्लागार रवींद्र नांचे, श्री उल्हास पेडणेकर साहेब, खजिनदार. संतोष वसंत पाटकर यांच्या उपस्थिती मद्ये व शुभ हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार सोहळा व शालेय साहित्याचे चे वाटप करण्यात आले. व प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एम. एल.डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स च्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य वाटप करताना मोठे योगदान दिले.
            सदर कार्याला देणगी देणाऱ्यांचे व उपस्थित पाहुण्यांचे श्री प्रकाश पाटकर यांनी आभार व्यक्त केले , शाळेच्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. विविध सामाजिक कार्य माझ्या मुळे तर आपल्या सर्वामुळेच शक्य असल्याचे त्यांनी सांगत तुमचे योगदान असेच सदैव असूद्या असे मत समाजसेवक प्रकाश पाटकर यांनी व्यक्त केले.
To Top