साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा : उत्तमराव कांबळे

Admin

सातारा : डिजिटल हॅलो प्रभात
               राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभाग तर्फे आज दि. 03 जुलै 2023 रोजी सातारा येथे मातंग समाज परिषद आयोजित करण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत आदरणीय खा. शरद पवार साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तम आबा कांबळे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कुमार लोंढे, संध्याताई आवळे, वंदना चंदनशिवे, आदर्श कांबळे, अभिजीत रांजणे, अर्जुन कांबळे, आकाश तिवडे, कुमार वायदंडे, भिमराव बँगलोरे, ग्राब्रियल तिवडे, विनायक हेगडे, संभाजी केंचे, लखन वारे आदी उपस्थित होते.
To Top