पश्चिम महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न |
वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्व घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करावे, शासनाने ही मागणी पूर्ण करावे यासाठी राज्यभर होणार्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेत चालू पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला नाही तर कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढायचा निर्धार पश्चिम महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकार्यांच्या बैठकीत करण्यात आला.राज्य संघटनेचे सल्लागार शिवगोंड खोत यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य संघटना सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित सांगलीत सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघूनाथ कांबळे, संघटन सचिव शाम थोरात, माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे, राज्य कार्यकारणी सदस्य आण्णा गुंडे, राजेंद्र माळी, गणेश पवार सातारा हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे यांनी केले. स्वतंत्र कल्याणकारी मंडळ, ग्रामिण भागातील एजंट व विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी शहरातील विक्रेते सोबत असुन सर्वांनी एकत्रीतपणे लढा तीव्र करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी मंत्रालयात कामगरा मंत्र्यांसमवेत झालेली बैठक व नांदेड येथे झालेल्या राज्य कार्यकारणी बैठकीची माहीती दिली. स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी लढा तीव्र करायचा असुन त्यासाठी सर्वांनी तयार रहावे असे आवाहन केले.शिवगोंड खोत यावेळी बोलताना म्हणाले, बांधकाम कामगारांप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांनाही स्वतंत्र कल्याणकारी मंडळच हवे. त्यासाठी संघटन अधिक मजबुत करून राज्यभर एकाच वेळी आंदोलन करायचे आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. प्रसंगी निषेध म्हणुन मोठ्या शासकीय जाहीरात असतील त्या दिवशी वृत्तपत्र वितरणावर बहिष्कार घालू. मंत्र्यांसह आमदार, खासदार व वरिष्ठ शासकीय अधिकार्यांना वृत्तपत्र देणे बंद करू.सरचिटणीस विकास सूर्यवंशी म्हणाले, राज्य संघटना गेली अनेक वर्षे याबाबत पाठपुरावा करत आहे. शासनाच्याच कामगार विभागाचे अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीनेही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाची पध्दत, व्यवसायाचे स्वरूप याचा विचार करून स्वतंत्र मंडळाची शिफारस केली आहे. तरीही सरकार टाळाटाळ करत आहे. कामगार मंत्री एका बाजुला स्वतंत्र मंडळ कोणाचे होणार नाही असे आम्हाला सांगतात आणि त्यानंतरही रिक्षाचालकांसह विविध जाती धर्मावर आधारीत विविध मंडळाची घोषणा सरकार करते. ही दुटप्पी भूमिका थांबवुन शासनाने आम्हाला न्याय द्यावा व कल्याणकारी मंडळ गठीत करावे. या मंडळाचा कोणताही आर्थिक भार सरकारवर न पडता होणार्या आर्थिक नियोजनाचे मार्गही अहवालात दिले आहेत.
बैठकीतील ठराव :
- वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्व घटकांसाठी हवे स्वतंत्रच मंडळ
- पश्चिम महाराष्ट्रात करणार तीव्र आंदोलन
- शासकीय जाहीरीतींचे अंक वितरण थांबवू
- मंत्री, आमदार,खासदार व वरिष्ठ शासकीय अधिकार्यांकडील वृत्तपत्र पुरवठा थांबवू.