युवानेते महेश घोरपडे यांचा भा.ज.पा. मध्ये प्रवेश

Admin

बहादुरवाडी : डिजिटल हॅलो प्रभात (रविंद्र लोंढे)
                        बहादुरवाडी (ता.वाळवा) येथील लोकनेते केशवराव घोरपडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवानेते मा.महेश घोरपडे यांनी इस्लामपूरचे लोकप्रिय नगराध्यक्ष,भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष, निशिकांत भोसले-पाटील यांच्या जन्मदिनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी मा.निशिकांत भोसले-पाटील यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व भारतीय जनता पार्टी त योग्य स्थान देण्याचे आश्वासन दिले.यावेळी मा.अक्षय भोसले-पाटील चेअरमन प्राजंली निधी अर्बन बँक मा.प्रविण माने उपाध्यक्ष भा.ज.पा.युवा मोर्चा सांगली जिल्हा मा.प्रविण परिट संघटक चिटणीस इस्लामपूर शहर भा.ज.पा. व मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना महेश घोरपडे म्हणाले मा.ना.देवेंजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे,मा.देवेंद्रजीच्या पाठीशी ठाम राहून सर्वसामान्य लोकांची कामे करू व मा.नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पार्टीचे काम घरा घरापर्यंत पोहचवण्याचे काम सहकार्यानं बरोबर करु.निशिकांत भोसले-पाटील यांचे आदर्शवत काम पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे शेवटी महेश घोरपडे बोलले. युवानेते मा.महेश घोरपडे हे गेली दहा वर्षे लोकनेते केशवराव घोरपडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवत आहेत,मा.महेश घोरपडे यांचा मित्र परिवार मोठा आहे तसेच महेश घोरपडे यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे. भविष्यात भा.ज.पा.च्या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांची कामे करणार असल्याचे ते बोलत होते. भा.ज.पा.प्रवेशानंतर जिल्ह्यातील भा.ज.पा.नेत्यांनी स्वागत व शुभेच्छा दिल्या.

To Top