आरोग्य संपन्न युवक हीच खरी राष्ट्राची संपत्ती : डॉ.साहिल जमदाडे

Admin


तासगाव : डिजिटल हॅलो प्रभात
        आरोग्य संपन्न युवक हीच राष्ट्राची खरी संपत्ती असून विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक जागृती बाळगली पाहिजे असे प्रतिपादन शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. साहिल जमदाडे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव राष्ट्रीय सेवा योजना व शासकीय ग्रामीण रुग्णालय तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हिमोग्लोबिन तपासणी व इतर तपासणी शिबिर तसेच केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड नोंदणी अभियान या संयुक्त समारंभात केले. ते पुढे म्हणाले की आज युवा पिढी सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलेली आहे, की आपल्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास, आपले राष्ट्र बलशाली होईल. अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामार्फत अभिनव अशा उपक्रमांचे आयोजन एन.एस.एस. मार्फत केले जात आहे, अशा उपक्रमांना शासकीय ग्रामीण रुग्णालय नेहमी सहकार्य करते,त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि एनएसएस मार्फत अशा लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल एन. एस. एस. च्या डॉ. बदामे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करतो.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. तातोबा बदामे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने एनएसएस मार्फत एक आरोग्य चळवळ उभी करण्याचा मनोदय व्यक्त केला.यावेळी अवयवदानाषयी जाणीवजागृती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी यासाठी सामूहिक शपथ घेण्यात आली. तसेच यावेळी केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत या योजनेच्या कार्डासाठी 411 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. हिमोग्लोबिन आणि इतर आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकूण 411 विद्यार्थ्यांची तपासणी महालॅब, आर. बी. एस. के. टीम एबीसी तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय लॅब या सर्व शासकीय यंत्रणांकडून करण्यात आली.तासगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय वाळके आणि महालॅबचे जिल्हा समन्वयक श्री सयाजी झांबरे यांनी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरास भेट देऊन सर्वांचे कौतुक केले. आभारप्रदर्शन स्वयंसेवीका प्रांजली जाधव हिने केले. सूत्रसंचालन स्वयंसेविका श्रुती शिंदे हिने केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. तातोबा बदामे, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. राहुल काळेल, एन.एस.एस. विद्यार्थी प्रतिनिधी सत्यजित मोहिते आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य जे.ए. यादव, नॅक समन्वयक डॉ.मेघा पाटील डॉ. अमोल सोनवले, डॉ. साईनाथ घोगरे, डॉ. श्रुती परचुरे, डॉ.पी. एस. भंडारे, प्रा पी. आर. खाडे, डॉ. एस. जे. पाटील, रजिस्ट्रार श्री एम. बी. कदम सर यासह ३० प्राध्यापक व एन.एस.एस.चे 300 विद्यार्थी व इतर विभागातील १११ असे एकूण ४११ विद्यार्थी उपस्थित होते.
To Top