कंत्राटी कर्मचारी भरती तात्काळ रद्द करा : फास्टा

Admin
सांगली : हॅलो प्रभात
        फुले आंबेडकर शाहू टीचर्स असोसिएशन, (FASTA) जिल्हा सांगली यांच्यावतीने, फास्टा संघटनेचे केंद्रीय सचिव, प्रो.डॉ.विनायक होनमोरे, यांच्या नेतृत्वाखाली, राज्य शासनाच्या संविधान विरोधी,अन्यायी कंत्राटी कर्मचारी भरतीच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत असुन खालील मागण्यासाठी, आज श्रीमती जोती पाटील निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री,शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक,पुणे.शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण, कोल्हापूर, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर, यांनाही तात्काळ पाठविण्यात आल्या, व सदर मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास फास्टा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

फास्टा संघटनेच्या मागण्या 
  • राज्यातील सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक योजना, तात्काळ रद्द करावी.
  • राज्य सरकारी सेवेतील विविध संवर्गातील सर्वच रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने, खाजगी संस्थांच्या माध्यमातून न भरता शासनाने स्वतःच्या यंत्रणामार्फतच तात्काळ भरावीत.
  • एनपीएस योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी.
  • पीएच. डी. गाईडशिपसाठी पी.जी.पूर्ण वेळ अध्यापनाच्या अनुभवाची अट तात्काळ शिथिल करावी.
  • सर्व विभागातील रिक्त पदांची आरक्षणासह त्वरित भरती करावी. इत्यादी
        यावेळी केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष प्रो.डॉ. विकास मिणचेकर, प्रा.डॉ.मिलिंद साळवे, प्रा.डॉ.संतोष खडसे, प्रा.डॉ.अनिल काटे, प्रा.डॉ.गंगाधर भुक्तर, प्रा राजेश कदम, प्रा.रमेश कट्टीमणी व सर्व फास्टा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
Tags
To Top