विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करा..!

Admin

 

ह्यूमन राईट कौन्सिल ऑफ इंडियाची मागणी
आटपाडी : डिजिटल हॅलो प्रभात
        कोळेकरवस्ती (ता.आटपाडी) येथील दुसरीतील विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी भारतीय मानवाधिकार परिषद च्या सांगली जिल्हा महिला अध्यक्ष अनिता जाधव यांच्या समवेत मानव अधिकार परिषदेच्या सदस्यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देऊन चौकशी केली. पण पीडित मुलीच्या पालकांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचं लक्षात आल्यानंतर भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये पालक पंढरीनाथ कोळेकर शिक्षक बाबासाहेब शेख व मध्यस्थी करणारे माजी उपसरपंच संजय कोळेकर यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे.
        ह्यूमन राईट कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कोळेकरवस्ती येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीस मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती. या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी ह्यूमन राईट कौन्सिल च्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता जाधव वैशाली आवळे व सदस्यांनी दि.२९ सप्टेंबर रोजी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्याकडून त्यांच्याकडे असलेली चित्रफित पाहिली व प्रत्यक्ष पीडित मुलीच्या घरी जाऊन पालक व पीडित मुलीशी संवाद साधला मात्र पीडित मुलीच्या पालकांनी चुकीची माहिती देऊन काहीतरी लपवत आहेत, अशी खात्री झाल्यानंतर त्यांनी थेट आटपाडी पोलीस स्टेशन गाठले व लेखी स्वरूपामध्ये पीडित मुलीचे पालक पंढरीनाथ कोळेकर मारहाण करणारे शिक्षक बाबासाहेब शेख मध्यस्थी करणारे माजी उपसरपंच संजय कोळेकर व चौकशी समितीचे सदस्य यांच्या वर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पोक्सो व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा. असा तक्रार अर्ज देण्यात आला आहे. यावेळी बोलताना आनिता जाधव म्हणाल्या जोपर्यंत घटनेतील सत्य उजेडात येत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
To Top