भाजप सरकारला ताळ्यावर आणले पाहिजे : कॉ.अतुल दिघे

Admin

 

कोल्हापूर : डिजिटल हॅलो प्रभात

        तरुणांनी एक होऊन बदल घडावावा, तसेच तरुणांनी क्रांतीकारक भगतसिंग यांचा विचार एक होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवविला पाहिजे तसेच या सरकारला ताळयावर आणण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, श्रमिक कार्यालय लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे क्रांतिवीर भगतसिंग यांची जयंती व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी सत्कार समारंभ संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने आजच्या तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी तसेच कंत्राटीकरण, खाजगीकरण, शासकीय संपत्तीची विक्री, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, कामगार कायद्यातील बदल, भांडवलदारशाहीला बळकटी, जातीय व धार्मिक द्वेष व तरुणाईचे भगवीकरण इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक कॉ. प्रकाश कांबरे, कॉ. सुनिल बारवाडे, कॉ. सुरेश पाटील, यशवंत सुर्यवंशी, जयश्री कुरणे मा.पं. समिती सभापती हातकणंगले, कॉ. अतुल दिघे, कामगार नेते, कॉ. सिध्दार्थ कॉ. ज्ञानेश्वरी ऐवाळे आदी उपस्थित होते.

        यावेळी कॉ. अतुल दिघे म्हणाले या लढ्यात तरुणांनी पुढाकार घ्यावा व हि अन्यायाविरुद्ध क्रांती घडवून आणावी लागेल,तरी प्रश्न सोडविण्यासाठी भगतसिंग ब्रिगेड नेहमीच पुढाकार घेईल असे अध्यक्ष यांनी सांगितले, तसेच येणाऱ्या दिवसांत शासनाच्या कंत्राटीकरणाच्या विरोधात कोल्हापूरातील सर्व तहसिलदार येथे निवेदन व निदर्शने अशी भूमिका घेणार असल्याचे कॉ. सतिश सर्वगोडे यांनी स्पष्ट केले, सुत्रसंचलन डेव्हिड लोखंडे , योगिता पाटील यांनी केले व आभार कुमार लोखंडे यांनी मानले.
To Top