आसद ग्रामपंचायतच्या वतीने एक तास एक साथ श्रमदान उपक्रम

Admin
देवराष्ट्रे : डिजिटल हॅलो प्रभात
        आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान यासाठी एक तास एक साथ श्रमदान उपक्रम आसद (ता.कडेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी आसद ग्रामपंचायतचे सरपंच मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय परिसर, बस स्टॅन्ड परिसर, मुख्य चौक परिसर, इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात आली. सदर उपक्रमात सरपंच मोहन जाधव, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जाधव, माधुरी जाधव, यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी तसेच श्रीपतराव तात्या कदम प्रशाला अंबक शाळेचे शिक्षक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

To Top