यशस्वीची पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी : असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय फलंदाज

Admin
Asian Games 2023 : डिजिटल हॅलो प्रभात
        भारताचा युवा फलंदाज यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी जायस्वाल याने शतक ठोकले आहे. असा पराक्रम करणारा यशस्वी पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. गोलंदाजाला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर यशस्वीने धावांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल याने 49 चेंडूत शतक ठोकले. या शतकी खेळीमध्ये त्याने सात षटकार आणि आठ चौकार ठोकले. यशस्वी जायस्वाल याने ऋतुराजसोबत शतकी खेळी केली, त्यानंतर भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. 
        भारताचा सलामीवीर यशस्वी जैसवालने एशियन गेम्समधील आपल्या पहिल्याच सामन्यात नेपाळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने संथ खेळपट्टीवर नवीन चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. ऋतुराजसोबत त्याने पॉवर प्लेमध्ये जवळपास 10 च्या सरासरीने धावा ठोकल्या. त्याने 22 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यानंतर पुढच्या 26 चेंडूत आपले शतक देखील पूर्ण केले.मात्र यशस्वीला साथ देणाऱ्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही. ऋतुराज गायकवाड 23 चेंडूत 25 धावांवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने या खेळीत 4 चौकार ठोकले. तर तिलक वर्मा 2 आणि जितेश शर्मा 5 धावाच करू शकला.
दुबे-रिंकूची फिनिशिंग :
        रिंकू सिंह आणि शिवब दुबे यांनी अखेरच्या षटकार वादळी फलंदाजी केली. दोघांनी चौकार षटकारांचा पाऊस पाडला. 22 चेंडूत 52 धावांची भागिदारी केली. रिंकू सिंह याने 15 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 37 धावा चोपल्या. तर शिवब दुबे याने 19 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या.
        दरम्यान भारतीय संघाने 20 ओवरमध्ये 202/4 अशी धावसंख्या उभी करून, नेपाळला विजयासाठी 203 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
Tags
To Top