श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारणी अंतीम टप्प्यात : पृथ्वीराज पाटील

Admin

श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारणी अंतीम टप्प्यात : पृथ्वीराज पाटील 

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात - 

आयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना दि. २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. सन १९८६ साली सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी आयोध्येतील श्रीराम मंदीराचे दरवाजे उघडून प्रभू श्रीराम दर्शन प्रश्न संपवला. प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत. आयोध्येत जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते. पण आजघडीला ते शक्य होईलच असे नाही.

सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सदहेतूनी आम्ही नेमिनाथनगर येथे कल्पद्रुम क्रिडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. 
मंदिर उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे. या मंदिरात रामलल्लांची जी मूर्ती असेल ती प्रत्यक्षात आयोध्या नगरीत विधीवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करुन आणण्यात येणार आहे. याच मूर्तीला घेऊन भक्तीपूर्वक आयोध्येत श्रीराम मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. दि.२१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. वसंतदादा समाधीजवळील रामटेकडी श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा प्रारंभ होऊन ती श्री गणपती मंदिर ते गणपती पेठ - सराफ कट्टा मार्गे कापड पेठ - दत्त मारुती रोड ते शिवाजी पुतळा - रिसाला रोड - पंचमुखी मारुती रस्त्यावरुन सांगली राममंदिर चौकातील श्रीराम मंदीरात समाप्त होईल . लेझीम, झांजपथक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात रामलल्लांचा जयघोषातील या शोभायात्रेत भगव्या ध्वजासह तिरंगा ध्वज अग्रभागी असेल.

दि. २२ जानेवारी २०२४ रोजी कल्पद्रुम क्रिडांगणावरील मंदिरात विधिपूर्वक रामलल्लांची प्रतिष्ठापना होईल. दि.२२ ते २८ जानेवारी या कालावधीत सकाळी ९.०० ते रात्री १०.००वा.पर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.
सात दिवस श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंदाच्या अनुभूतीचा लाभ सांगलीकरांना व्हावा यासाठी दररोज सायंकाळी ६.००वा.विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २२ जानेवारी रोजी महेश हिरेमठ आणि कलाकार यांचे श्रीराम भजन, २३ जानेवारी रोजी श्रीराम यज्ञ.. रामनाम जपसोहळा व हेमंत जोशी, मुंबई यांचे व्याख्यान, २४ जानेवारी रोजी लोकाभिराम श्रीराम या विषयावर सौ. धनश्री लेले मुंबई यांचे व्याख्यान, २५ जानेवारी रोजी परेश पेठे आणि कलाकार यांचे गीत रामायण, २६ जानेवारी रोजी आयोध्येतील विशेष निमंत्रित पुरोहितांकडून श्रीरामांची महाआरती, २७ जानेवारी रोजी आदित्य संप्रदायी राष्ट्रीय किर्तनकार भागवताचार्य हे. भ. प. योगेश्वर उपासनी महाराज

पुणे यांचे श्रीराम किर्तन आणि २८ जानेवारी रोजी लेझर शोध मधून विलोभनीय, नेत्रदीपक श्रीराम दर्शन असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

To Top