भाजपचे मंदिर स्वच्छता अभियान

Admin

इचलकरंजी : डिजिटल हॅलो प्रभात
        अयोध्या येथील श्रीराम मंदीरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंदीर स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार येथील भाजपच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली गावभागातील पुरातन विठ्ठल मंदिर मंदिर आणि परिसराची स्वच्छता करून अभियानाला सुरुवात करण्यात आली.
        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर देशवासीयांनी सर्व तीर्थ क्षेेत्रे, मंदीरांमध्ये 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहिम राबवून श्रमदानाचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजपाच्यावतीने श्री विठ्ठल मंदिरात स्वच्छता करून इचलकरंजीसह ग्रामीण परिसरातील मंदीर स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात महादेव मंदिर, मख्तुम दर्गा परिसर, मारुती मंदिर गुजरी पेठ, संत रोहिदास समाज मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात भाजपचे शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, रमा फाटक, अश्‍विनी कुबडगे, पुनम जाधव, सरला घोरपडे, पांडुरंग म्हातुगडे, राजेश रजपुते, वृषभ जैन, उमाकांत दाभोळे, रणजित अनुसे, मारुती पाथरवट, म्हाळसाकांत कवडे, अनिस महालदार, राजू भाकरे, प्रदीप मळगे, प्रमोद बचाटे आणि कार्यकर्ते, नागरीक, सहभागी झाले होते.
To Top