आ.डॉ.विश्वजित कदम यांच्यावर मोठी जबाबदारी

Admin
आ.डॉ.विश्वजित कदम यांच्यावर मोठी जबाबदारी

मुंबई : डिजीटल हॅलो प्रभात

अखिल भारतीय काँग्रेस समितीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटक,तेलंगणा, तामिळनाडू, केरळ,लक्षद्वीप,पुडुचेरी या सहा राज्यांच्या स्क्रीनिंग कमिटी सदस्यपदी आमदार डॉ.विश्वजित कदम यांची निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून सबंधित राज्यात आता लोकसभेच्या काँग्रेसपक्षाच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात येणार आहेत.पक्षातील ही मोठी जबाबदारी असणारी समिती आहे.
आगामी २०२४ च्या लोकसभेच्या निवडुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्व राज्यांसाठी नुकतीच स्क्रीनिंग समिती निवडण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खा.राहुल गांधी,काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेसह पक्ष नेतृत्वाकडून आमदार डॉ.विश्वजित कदम यांची सहा राज्यांच्या समितीवर नियुक्ती केली.या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने आ.डॉ.विश्वजित कदम यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

To Top