अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाल्यानंतर थेट गर्भगृहातून प्रभू श्रीरामांची पहिली झलक... व्हिडीओ पहा...

Admin

जय श्रीराम ! अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाल्यानंतर 
थेट गर्भगृहातून प्रभू श्रीरामांची पहिली झलक...

आयोध्या : डिजिटल हॅलो प्रभात
अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण आज आला. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर तयार झालं. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडली.

22 जानेवारीची निवड का करण्यात आली ? 
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान रामाचा जन्म अभिजीत मुहूर्तावर मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या संयोगादरम्यान झाला. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा जुळून आले आहेत. त्यामुळेच अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीची निवड करण्यात आली.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ही रामललाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आहे. यानंतर अवघ्या 84 सेकंदांच्या मुहूर्तावर रामाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आहे . सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह आहे. अयोध्येतील राम मंदिर सुंदर फुलांनी सजलं आहे.
To Top