सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे ! न झालास सरकारला सुट्टी नाही : मनोज जरांगे - पाटील

Admin
सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे !
न झालास सरकारला सुट्टी नाही : जरांगे - पाटील

जालना : डिजिटल हॅलो प्रभात 
राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज मराठा समाजातील समनव्यक आणि आंदोलकांची बैठक बोलावली. त्यानंतर आपलं मत व्यक्त केले. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा. मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या. आमचंच आरक्षण आम्हाला द्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  दरम्यान, समाजासाठी आजचा निर्णय महत्वाचा आहे. आजची बैठक तुमचं ऐकून निर्णय घेण्यासाठी आहे. आमरण उपोषण करू नका म्हणून मनोज जरांगें यांच्याकडे आंदोलकांची मागणी आहे.

करोडो मराठ्यांची ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे हे ते म्हणत होते. कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागलेत. जे रूसत होते, कुणबी नको म्हणून त्यांना काल कुणबी आरक्षण मिळाले, आता विरोध करणारे कोणी राहिले नाही मग आता सरसकट करायला काय हरकतय? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्या शिवाय सरकारला सुट्टी नाही. कुणबी आणि मराठे एकच असल्याचा एकाच ओळींचा कॅबिनेट निर्णय आवश्यक आहे, असे मनोज जरांगे -  पाटील म्हणाले.

 


काय आहेत मनोज जरांगे-पाटील यांच्या तीन मागण्या:  
1) मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून सर्व नोंदी सापडून सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी करा.
2) अंतरवली सह ,राज्यातील सर्व केसेस विना अट मागे घ्यायच्या.
3) हैदराबादचे गॅझेट घ्यायचे आणि ते स्वीकारायचे. 1881 चे गॅझेट घ्या,1901 ची जनगणना घ्यावी,बॉम्बे गॅझेट घ्या.

To Top