पाण्यासंदर्भात तालुक्यासह जत शहर चक्काजाम ; विजापूर - गुहागर राज्यमहामार्गावर अडीच तास वाहतूक ठप्प

Admin

पाण्यासंदर्भात तालुक्यासह जत शहर चक्काजाम 
 विजापूर - गुहागर राज्यमहामार्गावर अडी तास वाहतूक ठप्प
जत : डिजिटल हॅलो प्रभात 
जत तालुक्यात सद्यस्थितीत भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या 69 गावात एकाच वेळी सिंचन योजनेचे काम सुरू करावे या मागणीसाठी, जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या सर्व पक्षीय आंदोलनामुळे सुमारे अडीज तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या सहीत १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जत शहराबरोबर जत तालुक्यातील अनेक प्रमुख गावांमध्ये एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात आल आहे.
जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित योजने मधील ६५ गावे आणि टेंभू योजनेतील ४ गावे अशी एकूण ६९ गावे पाण्यापासून वंचित आहेत. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे. यंदा ही एकूण ४९ गावात ५० टँकरने अपुरा पाणी पुरवठा होत आहे.
म्हैसाळ विस्तारित योजने मधील टप्पा क्रमांक एकच काम सुरू आहे, मात्र त्या गावात आगोदरच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे जिथं पाणी अजून आले नाही, तेथेही एकाच वेळी सिंचन योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी आहे. कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात यंदाही पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरित या गावांना सिंचन योजनेचे पाणी मिळावे अशी मागणी आहे. आत्तापर्यंत तीन आंदोलन करण्यात आले आहेत. यापुढे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढन्यात येणार आहे. पाण्याची मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जत तालुका निवडणुकीवर बहिष्कार टाकेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.आहे.दरम्यान, मंगळवरच्या आंदोलनाला जत शहरासह तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.
सकाळी नऊ वाजता जत शहराला व तालुक्याला जोडणारे सर्व रस्ते आंदोलकांनी ब्लॉक केले. येथील सोलनकर चौक, बिळूर रस्ता, शेगाव रोड, सांगली रोड, शिवाजी चौक आदी ठिकाणी आंदोलक रस्त्यावर बसून होते. रुग्णवाहीका व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता एकही वाहन दुपार पर्यंत बाहेर पडू दिले नाही. जत आगारातून जाणाऱ्या एसटी गाड्याही दुपार पर्यंत बंद होत्या. शहरात आंदोलन चिघळू नये याची खबरदारी पोलीसांनी घेतली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, उमदी भागात निरीक्षक संदीप शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

माजी आमदारसह पदाधिकारी पोलीसांच्या ताब्यात
जत शहर सकाळी ब्लॉक केल्यानंतर आंदोलक दुपारपर्यंत रस्ता मोकळा करण्यास तयार नव्हते. याचवेळी पोलीसांनी विलासराव जगताप, सुरेशराव शिंदे, युवक नेते विक्रम ढोणे,बंटी दुधाळ, प्रमोद सावंत, शिवाजी पडोळकर, स्वप्नील शिंदे, अण्णा भिसे, गौतम ऐवळे,, प्रकाश माने, संतोष मोटे, नसीर मुल्ला, सुनील बागडे, बसवराज चव्हाण, मकसूद नगारजी, अजिंक्य सावंत, संग्राम जगताप, योगेश व्हनमाने, अविनाश वाघमारे, संतोष कोळी, बाळासाहेब निगणूर, पिंटू तंगडी, कुमार कोळी, मेहबूब गवंडी, इम्रान गवंडी, विकी बुवा आदी पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. दुपारनंतर यांना पोलीसांतून सोडण्यात आले.
जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेतून समावेश नसलेल्या उर्वरित विशेष ६५ गावांसाठी म्हणून म्हैसाळ विस्तारित योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचं संपूर्ण कार्यक्षेत्र/ लाभक्षेत्र जत तालुका आहे पण या योजनेचे विभागीय व उपविभागीय कार्यालय सांगली येथे कार्यरत आहे त्यामुळे प्रशासनाचा आणि लाभधारकांचा वेळ, श्रम, शासकीय खर्च अनावश्यक होतो आहे तसेच लोकप्रतिनिधी आणि लाभधारकांची गैरसोय होत आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम दर्जेदार व वेळेत होण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचे विभागीय व उपविभागीय कार्यालय जत येथे स्थलांतरित करणे गरजेचं आहे.त्यामुळे तातडीने विस्तारित म्हैसाळ योजनेचे विभागीय व उपविभागीय कार्यालय जत येथे स्थलांतरित करावे.
- विक्रम ढोणे,युवा नेते

दै.हॅलो प्रभात : आजचा ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

या आंदोलनामध्ये माजी आमदार विलासराव जगताप, सुरेशराव शिंदे, युवक नेते विक्रम ढोणे,बंटी दुधाळ, प्रमोद सावंत, शिवाजी पडोळकर, स्वप्नील शिंदे, अण्णा भिसे, गौतम ऐवळे,, प्रकाश माने, संतोष मोटे, नसीर मुल्ला, सुनील बागडे, बसवराज चव्हाण, मकसूद नगारजी, अजिंक्य सावंत, संग्राम जगताप, योगेश व्हनमाने, अविनाश वाघमारे, संतोष कोळी, बाळासाहेब निगणूर, पिंटू तंगडी, कुमार कोळी, मेहबूब गवंडी, इम्रान गवंडी, विकी बुवा तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
To Top