मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले, त्यामुळेच सीरम इन्स्टिट्युटला कंत्राट मिळालं : प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Admin
'मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले, त्यामुळेच सीरम 
इन्स्टिट्युटला  कंत्राट मिळालं'  : प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

सोलापूर : डिजिटल हॅलो प्रभात 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि दावे-प्रतिदावे पाहायला मिळत आहे. 'मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले, त्यामुळेच सीरम इन्स्टिट्युटला करोना लसीच कंत्राट मिळालं', असा गंभीर आरोप आमदार प्राणिती शिंदे यांनी केला आहे. कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, BP चा त्रास, त्यामुळेच मी लस घेतली नाही, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 
कोविड वॅक्सिनमुळे ज्यांना काही दुखणे नव्हते, अशांना देखील बीपी, शुगर हृदयविकार झाले. त्या शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देताना लोकांशी संवाद साधला.आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान केलेल्या अजब दाव्यांनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. "सरकारने वॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे लोकाना जबरदस्ती केली", असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. याचं दरम्यान इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून मोदीवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदेंनी कोरोना वॅक्सिन संदर्भात अजब दावा केला आहे.


सीरमने मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले आणि कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली. 
सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आलं. आपल्याला ज्या सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली. त्या पुढे म्हणाल्या सीरम कंपनीने देखील 100 कोटी रुपये दिले आहेत, आपल्याला मारण्यासाठी. टेन्शन नका घेऊ पण आपल्याला वॅक्सीन जबरदस्ती का केलं, कारण सरकारने वॅक्सीन विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने वॅक्सिन विकत घेतलं. तुम्हाला त्या वॅक्सिनसाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणं सुरू झालं आहे.

Tags
To Top