१६ मार्चला नाईट कॉलेजचा पारितोषिक वितरण सोहळा

Admin

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सांगली सन २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक १६ मार्च २४ रोजी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग येथे होणार असल्याची माहिती प्राचार्य बी.व्ही.पाटील यांनी दिली. 

सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असून संस्थेच्या शासक समितीचे अध्यक्ष राजीव पाटील, संस्थेचे चेअरमन शांतिनाथ कांते, व्हा.चेअरमन चंद्रकांत पाटील, मानद सचिव, सुहास पाटील, खजिनदार भालचंद्र पाटील, विश्वस्त चेअरमन प्रमोद चौगुले, विजय नवले हे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३ - २०२४ या मध्ये क्रीडा सांस्कृतिक व शिक्षण विभागातील जिल्हास्तरीय राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरीय,आखिल भारतीय आंतर विद्यापीठ व ' खेलो इंडिया' राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत चमकदार कामगिरी करून विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडूंना स्व.नेमगोंडा दादा पाटील आणि स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार स्व.धुळाप्पांण्णा भाऊराव नवले क्रीडा शिष्यवृत्ती व पारितोषिके दिली जाणार आहेत. 


राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी यांनाही पारितोषिके देऊन गौरव केला जाणार आहे. तरी या सोहळ्याला अगत्यपुर्वक उपस्थित राहावे असे आवाहन उपप्राचार्य डॉ.एस. डी. पाटील व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक एन.डी .बनसोडे यांनी केले आहे.
To Top