विलासराव जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी ...

Admin
विलासराव जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी... 
प्रमोद शेंडगे,अरविंद तांबवेकर,नितीन पाटील यांची मागणी

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात

        भाजपाचा लोकसभा निवडणूकीतील उमेदवार जाहिर झालेला असताना विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध करुन पक्ष शिस्त मोडली आहे. याची गंभीर दखल पक्षाने घेऊन जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे,जिल्हाउपाध्यक्ष अरविंद तांबवेकर,नितीन पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. जगताप यांनी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे वागू नये,अन्यथा जशात तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही शेंडगे,तांबवेकर यांनी दिला.

        सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाने तिसर्‍यांदा विद्यमान खा.संजय पाटील यांनी उमेदवारी जाहिर केली. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय समिती देईल त्या उमेदवाराचा प्रचार करुन निवडून आणण्याचा एकमताने ठराव करणारे,ठरावावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे विलासराव जगताप पक्षशिस्त मोडून उघडपणे विरोध का करीत आहेत? 400 प्लसची भाषा पतंप्रधान नरेंद्र मोदी करीत असताना ,पक्षाची उमेदवारी जाहिर झालेली असताना जगताप यांनी जाहिर केलेल्या उमेदवारीच्या विरोधात उघडपणे बोलणे चुकीचे आहे.विलासराव जगताप यांनी केलेले सर्व आरोपही निराधार आहेत.
जत विधानसभा मतदारसंघातून विलासराव जगताप यांनी आपल्या पराभवास संजयकाका पाटील जबाबदार असल्याचा आरोप केला आहे,हा आरोप निराधार आहे. जगतापांच्या पराभवास त्यांचा हेकेखोरपणा जबाबदार आहे असेही शेंडगे,तांबवेकर म्हणाले. 
        जिल्ह्यातील सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग यासाठी केंद्राशी पाठपुरावा करुन ओढून आणलेला निधी असताना ते केंद्राचे विकास काम आहे ,योजना सरकारने केल्या, असे म्हणायचे,दुसरीकडे ड्रायपोर्ट,विमानतळ हे दोन्ही प्रश्‍न तांत्रिक बाबीमुळे अडकलेल्या असताना हे दोन्ही प्रश्‍न संजयकाकांनी सोडवले नाहीत असे म्हणायचे,हा कुठला न्याय? जिल्ह्यात हजारो कोटीची विकास कामे केलेली असताना त्या कामालाच खोडा घालायचा हा एकच उद्योग जगताप यांनी केला.


भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय कमिटी जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याचा ठराव झाला ,यावर विलासराव जगताप,गोपीचंद पडळकर यांच्या सह्या आहेत.उमेदवारी मागणे हा प्रत्येकाला अधिकार आहे.परंतू उमेदवारी जाहिर झाल्यावर उमेदवार बदला अशी मागणी करणे हे पक्षशिस्तीला धरुन नाही.असेही शेंडगे,तांबवेकर म्हणाले. 
        जगताप यांनी संजयकाकांचे काँग्रेस विश्‍वजित कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याशी सेटलमेंट असल्याचा आरोप केला आहे,याला उत्तर देताना दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे. जगताप यांनी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलायचे बंद करावे.जगताप यांनी उमेदवारी जाहिर झालेली असताना विरोधात बोलून पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
Tags
To Top