2019 मध्येच रोहित पवार भाजपात प्रवेश करणार होते ; त्यांना उमेदवारी हवी होती !

Admin
2019 मध्येच रोहित पवार भाजपात प्रवेश करणार होते 
त्यांना हडपसरमधून उमेदवारी हवी होती !

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात 
        2019 मध्येच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते. हडपसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला. 
        रोहित पवारांना अनेकदा आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला. हडपसरमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागायला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थीच्या मार्फत गेला होतात ? 2019 ला विधासभेच्या निवडणुकीवेळी हे सुरु होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना स्थान मिळाले नाही. म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपकडे कोण जाणार होतं हे माहिती आहे. ज्यांच्या मार्फत प्रवेश होणार होता, ते आज एकेठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी आता काय सांगावे की, भाजपमध्ये आम्ही जाणार होतो. पण आम्ही भाजपमध्ये गेलो नाहीत. आम्ही भाजपसोबत आहोत. तेव्हा आम्हाला सत्तेत जाण्याचा मार्ग दिसला. 

सुनील तटकरे पुढे काय म्हणाले ? 
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे काही घडलं ते पाहा. जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलं होतं. सरकार स्थापन करण्याची औपचारिकता राहिली होती. केव्हाही सरकार स्थापन होऊ शकलं असतं. दोन प्रमुख पक्ष सोबत लढल्यानंतर त्यांना कौल दिला होता. ते सरकार स्थापन करत नाहीत, तेव्हा आम्हाला सत्तेत जाण्याचा मार्ग दिसला. आम्हाला दोन्ही पर्याय दिले. भाजपचाही आणि शिवसेनेचाही होता. त्यातून महाविकास आघाडीचा पर्याय आला.


जागा वाटपाविषयी बोलताना काय म्हणाले तटकरे ?
जोपर्यंत जागा घोषित होत नाही. तोपर्यंत प्रत्येकजण दावा करत राहणार आहे. नाशिकच्या  जागेचा निर्णय 1 ते 2 दिवसांमध्ये होईल. छगन भुजबळ पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा 45 वर्षाचा अनुभव आहे. मुंबई महापालिकेपासून त्यांनी कार्यक्षेत्र सुरु केलं. त्यामुळे त्यांचे काही राजकीय आडाखे असतात, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.

Tags
To Top