धाराशिव : डिजिटल हॅलो प्रभात
मराठा नेते मनोज जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीत यावं, त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली असल्याचं वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. ते धाराशिवमध्ये बोलत होते. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी दि.8 रोजी तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. ते पुढील दोन दिवस मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करणार आहेत.
त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं तसा देण्याचा प्रयत्न करूसंभाजीराजे छत्रपती म्हणाले, तसेच राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात कसे टिकते याबाबत ही मला शंका आहे. फार गुंतागुंतीचा प्रश्न असल्याचे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणावर ही प्रश्न उपस्थित केला आहे. एवढेच नाही माझ्या हातात राज्य आल्यानंतर मी आरक्षणाचा गुंता सोडवतो. मी छत्रपती शाहू महाराजांचा नातू आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं तसा देण्याचा प्रयत्न करू शकतो, असंही संभाजीराजे म्हणाले.