निवासी शाळेतील मुलांना जेवणातून विषबाधा
विटा : हॅलो प्रभातयेथील शासकीय निवासी शाळेतील 24 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना तातडीनं विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा डॉ. विक्रमसिंह कदम यांनी अलर्ट केली आहे. आसपासच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि बालरोग तज्ञांना रुग्णालयाकडे जाऊन आवश्यकते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित वसतीगृहातील विषबाधा झाली आहे असे सोडून इतरांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक पाठवले आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.