लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी...

Admin
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर 
याद राखा, गाठ आमच्याशी... 
मुंबई : हॅलो प्रभात
लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांनी योजनेतून स्वत:हून बाहेर पडाले, सरकारकडे पैसे जमा करावे असे सांगण्यात आलंय. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी महिलांकडून पैसे परत घेतले जातील असे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांनी स्पष्टीकरण देताना बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नसून ज्यांना परत कारायचे आहेत, त्यांना ते सरकारी तिजोरीत जमा करता येतील असे म्हटलं आहे. दरम्यान, लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे असा इशाराच रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारला दिला. स्वतःला सख़्खे लाडके भाऊ म्हणवून घेणारे आता सावत्र झाले. बहिणीची ओवाळणी परत घेणारं फसव महायुतीचे सरकार असल्याची टीका रोहिणी खडसेंनी केलीय.


विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक योजना सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आल्या. त्या योजनांमध्ये प्रामुख्याने लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना,  तीर्थयात्रा योजना,  अशाअनेक योजनांचा समावेश करण्यात आला. एकीकडे प्रचाराच्या जाहिरातीसाठी सरकारी तिजोरीतून वारेमाप खर्च सुरू असताना, दुसरीकडे या योजनांच्या माध्यमातून भविष्यातील आर्थिक नियोजनाचा कसलाही विचार न करता फक्त योजना अंमलात आणून मतांची गोळाबेरीज लावून घ्यायची आणि निवडणुका जिंकायच्या हा एकच उद्देश. त्यात त्यांना यश देखील मिळालं. परंतु ज्या लाडकी बहीण योजनेमुळे आज महायुती सरकार सत्तेवर आलं. ज्या माझ्या माता भगिनींनी कुठलाही विचार न करता महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केलं. आज त्यांचीच फसवणूक करण्याचा डाव सरकारने मागील काही दिवसांपासून आखल्याची टीका रोहणी खडसे यांनी केली आहे.
Tags
To Top