घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदा वाहतूक : एकास अटक

Admin
घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदा वाहतूक : एकास अटक
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई

मिरज : हॅलो प्रभात 
सांगली येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने मिरज शहरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एकास अटक करून त्याच्याकडील 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , मिरज शहर येथे शिवाजी क्रिडांगणाजवळ कच्ची हॉल येथून बेकायदा घरगुती गॅस सिलेंडर वाहतूक करीत असले बाबत माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. एका बजाज मॅक्सीमा माल वाहतुकीच्या रिक्षामध्ये भारत गॅस कंपनीचे लाल रंगाचे पिवळी पट्टीचे घरगुती वापराचे 25 सिलेंडर असलेचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी रिक्षा चालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रशांत अशोक टाकवडे वय 27 वर्षे राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज असे सांगितले. 


गॅस सिलेंडर विक्रीच्या परवान्याबाबत त्याच्याकडे विचारले असता परवाना नसल्याचे त्याने सांगितले. तसेच हे 25 गॅस सिलेंडर जयसिंगपूर येथील गॅस एजन्सी मधील काढून टाकलेल्या जुना कामगार रफिक दर्गावाले याचे कडून मिरजेत विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी प्रशांत टाकवडे याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या ताब्यातील 25 गॅसचे सिलेंडर व मॅक्सिमा रिक्षा व मोबाईल असा एकूण 2 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.
Tags
To Top