जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू ; ४० जण गंभीर जखमी

Admin
जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू 
 ४० जण गंभीर जखमी

जळगाव : हॅलो प्रभात
येथील परधाडे  रेल्वेस्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून आतापर्यंत १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची तर  ४० जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवार (दि.२२) रोजी दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

दुर्घटना कशी घडली... 
दुपारी ४ : ०० वाजेच्या सुमारास जळगाव स्थानकावरुन  पुष्पक एक्स्प्रेस पाचोऱ्याच्यादिशेने निघाली. माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या.  एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काहीजण रेल्वेगाडीखाली चिरडले गेले.


दरम्यान, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालात १२ जणांचे मृतदेह दाखल झाले. तर त्यातील काही प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

To Top