6 गुंठ्यांत भुईमूगाचे घेतले 20 हजारांचे उत्पन्न

Admin
6 गुंठ्यांत भुईमूगाचे घेतले 20 हजारांचे उत्पन्न 

पन्हाळा : हॅलो प्रभात
येथील श्रीकृष्ण दुध संस्थेचे कर्मचारी शहाजी चौगुले यांनी दूध संस्थेत काम करत असून शेतीही चांगल्या पद्धतीने केली आहे.त्यांनी सहा गुंठे क्षेत्रात वेस्टन च्या भुईमूगाची पेरणी केली होती. या प्लॉटच्या सभोवती तिळाची लागण केली होती. या तिहेरी पिकात चौगुले यांनी अवघ्या तीन महिन्यात सुमारे 20 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. मसाई पठाराच्या पायथ्याशी मुरुम मातीत ऊसाची लागवड केली होती. यात अंतर पिकं म्हणून भुईमूग, तीळ यांची पेरणी केली होती.


मशागत चांगली करुन वेळेच्या वेळी खत व पाणी दिल्याने पिक चांगले आलं होतं.एका जाळीला एकशे वीस ते दिडशे शेंगा लागलेल्या होत्या.यातुन त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.शेती चांगल्याप्रकारे केली तरच फायदेशीर ठरते अन्यथा शेतीत तोटा सहन करावा लागतो.यामुळे तरुण शेतकऱ्यांनी शेती योग्य पध्दतीने करावी असा सल्ला त्यांनी हॅलो प्रभात शी बोलतांना दिला आहे.
To Top