होलार समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Admin
होलार समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या
सत्कार समारंभाचे आयोजन

नातेपुते : हॅलो प्रभात
अखिल भारतीय होलार समाज संघटना शैक्षणिक विभाग माळशिरस तालुका यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार दि. 25 मे रोजी संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून राकेश वेद, रवींद्र गोरवे, संजय जावीर, सिद्धनाथ जावीर हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष-राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार,कार्यक्रमाचे उद्घाटक सुषमा महामुनी स्वागताध्यक्ष सुनील ढोबळे हे राहणार आहेत.


यंदाचा समाजभूषण पुरस्कार विजय हेगडे यांना देण्यात येणार आहे.तसेच विशेष सत्कारमूर्ती म्हणून माळशिरस तालुक्यात अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून राष्ट्रीय नेते किरण जावीर, प्रदेशाध्यक्ष रणजीत ऐवळे, राष्ट्रीय सचिव हैदर केंगार,आर पी आय नेते दयानंद धाईंजे,एन के साळवे, महिला प्रदेशाध्यक्ष अॅड चारुशिला गेजगे ,राज्य सचिव मधुकर भंडगे व जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर गुळीग, किसनराव ढोबळे, बाजीराव केंगार, लालासो गेजगे, ब्रह्मदेव केंगार, शिवाजीराव होनमाने, हनुमंत बिरलिंगे, बाळासो पारसे, बापूराव करडे, दिनेश जावीर, तुकाराम कांबळे, व माळशिरस तालुक्याने नियोजन केले आहे.

To Top