देशाच्या, राज्याच्या विकासात महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. सहकार क्षेत्रात सुद्धा कालानुरूप बदल स्वीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ते मुरगूड, ता. कागल येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ होते.
ते मुरगूड, ता. कागल येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सर्वसामान्यांना आर्थिक हातभार लावून त्यांना सक्षम बनवण्याचे विश्वनाथराव पाटील मुरगुड बँकेने केलेले काम कौतुकास्पद आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा वारसा रचला तू पुढे नेण्याचे काम आम्हाला करायचे आहे, तो आम्ही करतोय आणि करत राहणार.
शेतकरी ही आमची जात आहे शेतकऱ्यांनी नव नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केली पाहिजे. ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आता ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. ही योजना एम एस सी बँकेने आणली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. काळमावाडी गळतीचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण केले जाईल. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. जनतेन जनतेच काम केलं, आता आम्हाला करायचा आहे शेतकऱ्यांच्या आणि लाडक्या बहिणींच्या योजना किमान मी अर्थमंत्री असेपर्यंत तरी बंद होऊ देणार नाही
यावेळी बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले, गेल्या 75 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना सुखी करण्याचा, त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या बँकेने केला आहे .या बँकेची आतापर्यंतची वाटचाल सहकाराला मार्गदर्शक व दिशादर्शक आहे. बँक यापुढे 200 कोटीचा टप्पा पूर्ण करून 25 शाखेच्या विस्ताराचा टप्पाही पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
![]() |
Advertisement |
स्वागत व प्रास्ताविक बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे, रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांची भाषणे झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू प्रधान करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष बाबासाहेब पाटील, अमरसिंह माने पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, आदिल फरास, दिग्विजय पाटील, सुहासिनीदेवी पाटील आदींसह सभासद मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार बँकेचे व्हाईस चेअरमन वसंतराव शिंदे यांनी मानले.