नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना करा ; जिल्हा प्रशासनाला सुप्रिया सुळे यांची विनंती

Admin

दौंड : हॅलो प्रभात
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि परिसरात गेल्या काही दिवसांत विक्रमी अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तर अनेक ठिकाणी शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी दोहा, कतार येथून दूरध्वनी वरुन संपर्क साधून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. 
 

बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातील परिस्थितीची सातत्याने माहिती घेत असून याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात देखील असल्याचे सुळे यांनी सांगितले. माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की आपण आपत्ती व्यवस्थापनासह कृपया आरोग्याच्या दृष्टीने देखील उचित उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आणि गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे अशी विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 
To Top