![]() |
रमेशचंद्र घुगे यांचा शेकडो पदाधिकाऱ्यांसह भाजपा प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले सर्वांचे स्वागत |
मुंबई : हॅलो प्रभात
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते रमेशचंद्र घुगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपाची ध्येयधोरणे ही जनसामान्यांच्या कल्याणासाठी असल्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कणखर नेतृत्वामुळे विकसित भारत व विकसित महाराष्ट्र घडणार असल्याचा विश्वास असल्याने श्री. घुगे यांनी भाजपा प्रवेश केला आहे. भाग्यश्री सहकारी पतसंस्था, ज्ञानदीप बहुउद्देशीय विकास सेवा संस्था, शेतीमाल खरेदी विक्री व प्रक्रीया सहकारी संस्था, नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक संघ नाशिक, नाशिक खादी व ग्रामोद्योग उत्पादक संघ तसेच नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्थेचे संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट करणारे श्री. घुगे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाला अधिक ताकद मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी ग्वाही श्री. बावनकुळे यांनी दिली.
कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनतेच्या हितासाठी भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे श्री. घुगे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये खंडेराव चव्हाण, रामदास सानप, विठ्ठलराव गचाले, सुरेश कातकाडे, विजय कातकाडे आदींचा समावेश आहे.
कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनतेच्या हितासाठी भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे श्री. घुगे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये खंडेराव चव्हाण, रामदास सानप, विठ्ठलराव गचाले, सुरेश कातकाडे, विजय कातकाडे आदींचा समावेश आहे.